अमरावती-मोर्शी बसवर अज्ञातांकडून दगडफेक

या घटनेची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दिली.
अमरावती-मोर्शी बसवर अज्ञातांकडून दगडफेक
अमरावती-मोर्शी बसवर अज्ञातांकडून दगडफेकSaam TV

अमरावती : एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाला झुगारून मोर्शी बस आगारातून अमरावती-मोर्शी बससेवा सुरू करण्यात आली. ही बस मोर्शी आगारातून अमरावती, मोर्शी-वरुड या ठिकाणी पाठवल्या गेली. मात्र परत अमरावती आगारात येत असताना वेलकम पॉईंट समोरील अर्जुन नगर परिसरात बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. या दगडफेकीत बसची समोरील काच फुटली. त्यामुळे बसमधील असलेल्या प्रवाशांमध्ये काही वेळ भीती निर्माण झाली होती. या घटनेची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दिली.

राज्य सरकारने वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे गेल्या एक महिना एक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संपही कायम आहे. मात्र या संपाला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागत आहे. आता जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. मोर्शीहून अमरावतीकडे परतणाऱ्या (एमएच ४०, एन - ९१२८) हा क्रमांक असलेली बस प्रवाशांना घेऊन अमरावती आगारात येत असतांना रात्री ८ वाजता दरम्यान अर्जुन नगर परिसरात अज्ञातांकडून बसवर दगडफेक झाली. यामध्ये बसची समोरील काच फुटली. असून गाडगे नगर पोलीस अधिक तपास करीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.