सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईविजय पाटील

सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता कोरोना नियमांची चोख अंमलबजावणी करण्याचे धोरण अंगिकारले आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता नियमांची चोख अंमलबजावणी करण्याचे धोरण अंगिकारले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. नियम तोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळपासून जवळपास १० नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. Strict action against violators Of Corona Rules In Sangli

हे देखील पहा -

सांगलीत कोरोना रुग्णसंख्या वाढत चालल्याने 19 जुलैपर्यंत सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर पोलीस आणि महापालिका यांची पथके कार्यरत आहेत.

सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
दहावीच्या निकालात पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल

नियम तोडणाऱ्यावर कारवाईसाठी, आज पोलीस मनपा अधिकारी, स्वच्छता निरीक्षक तसेच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सांगलीतील प्रमुख बाजारपेठेत कारवाई सुरू केली. यामध्ये विनामास्क सापडलेल्या 10 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर एका चहाच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे आणि कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com