Latur News: शिक्षकाचं एक वाक्य जिव्हारी लागलं! विद्यार्थिनीने जीवनच संपवलं

परीक्षेदरम्यान पेपर सुरु असताना पुन्हा त्याच शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांसमोर तिला कॉपीगर्ल म्हणत अपमान केला.
Crime News
Crime Newssaam tv

लातूर : लातूर शहरात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यान एकच खळबळ उडाली आहे. औसा रोड भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाचं बोलणं जिव्हारी लागल्याने विद्यार्थिनीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

श्रावणी असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. श्रावणी एका नावाजलेल्या शाळेत शिक्षण घेत होते. शाळेतील एका शिक्षकाने 'कॉपी गर्ल' म्हणून भर वर्गात सर्वांसमोर उल्लेख केला. आपला अपमान झाल्याचं मनात ठेवत श्रावणीने औसा रोड येथील राहत्या घरी आत्महत्या केली. (Latest Marathi News)

Crime News
Mumbai News: रहस्यमयरित्या गायब झालेल्या स्वदिच्छाबाबत धक्कादायक माहिती उघड, तब्बल 14 महिन्यानंतर आरोपींनी तोंड उघडलं

श्रावणी नववीच्या वर्गात शिकत होती. प्रथम सत्र परीक्षेत शिक्षकांनी श्रावणीची कॉपी पकडली होती. तिची कॉपी पकडल्यामुळे अपमान झाल्याची भावना तिच्या मनात होती. ९ ते १७ जानेवारी दरम्यान सीबीएसईच्या दुसर्‍या सत्राची परीक्षा सुरू होती. परीक्षेदरम्यान पेपर सुरु असताना पुन्हा त्याच शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांसमोर तिला कॉपीगर्ल म्हणत अपमान केला.

Crime News
Safety Tips: गाडी चालवताना अशी काळजी घेतल्यास अपघात होणारच नाही

हाच अपमान तिच्या मनात घर करून होता, असे तिच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत उल्लेख असल्याचे समजते. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com