Beed News: अभ्यास करुनही लक्षात राहत नाही म्हणून विद्यार्थीनीने संपवलं जीवन

अभ्यास करूनही लक्षात राहत नसल्याने पुढे काय होणार? या भीतीने इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Students
StudentsSaam TV

Beed News: बीडमध्ये एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभ्यास करूनही लक्षात राहत नसल्याने पुढे काय होणार? या भीतीने इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रेरणा किसन डोंगरे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील कोठी येथे घडली आहे. (Latest Beed News)

दहावीची परीक्षा मार्चमध्ये असल्याने प्रेरणा ही दररोज अभ्यास करून तयारी करत होती. मात्र केलेला अभ्यास तिच्या लक्षात राहत नसल्याने ती चिंतेत होती. या भीतीतूनच तिने घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दरम्यान मयत प्रेरणाचे वडील किसन डोंगरे यांच्या माहितीवरुन केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशीच एक घटना लातूरमध्ये देखील घडली आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने गळफास गेऊन आत्महत्या केली आहे. तरुणी ज्या वस्तीगृहात राहत होती तिथेच तिने आपले जीवन संपवले आहे. सदर घटनेने वस्तीगृहातील इतर मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी गायकवाड (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती मुळची औरंगाबाद येथील होती. तसेच लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. आज (१८ जानेवारी) रोजी तिची एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. परंतु, काल रात्री तीने आपले जीवन संपवले आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील मुलींच्या वस्तीगृहात तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Students
Beed News: पैसे भरूनही वीज कनेक्शन नाही; अंगावर पेट्रोल ओतून संतप्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

साक्षी ही अभ्यासात हुशार होती. तिला वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव कमवायचं होतं. सदर घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थीनीने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे अद्याप समजू शकलेले नाही. या संदर्भात साक्षी जवळच्या मैत्रिणींनी कोणतेही संभ्रमात्मक बाब अद्यापही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेली नाही.

Students
Latur ST Bus Accident : लातुरात एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटून भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी

याप्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य कोल्हे पुढील तपास करत आहेत. आत्महत्येचा निर्णय घेतला त्या अगोदर साक्षीचं कुणाशी काही बोलणं झालं होतं का? याचीही चौकशी पोलिस करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com