परीक्षा शुल्काविरोधात चंद्रपुरात विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन

अतिदुर्गम मागासलेला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने यावर्षी परीक्षा शुल्कात केवळ 10 टक्के कपात केली आहे.
परीक्षा शुल्काविरोधात चंद्रपुरात विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन
परीक्षा शुल्काविरोधात चंद्रपुरात विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलनसंजय तुमराम

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या गोंडवाना विद्यापीठाविरोधात विद्यार्थ्यांनी आज भीक मांगो आंदोलन केले. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, त्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याच काळात शिक्षण ऑनलाईन झाले आहे. मात्र चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्कामध्ये नाममात्र घट करून विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा वाढवला आहे. अशाच प्रकारची परिस्थिती गोंडवाना विद्यापीठाची सुद्धा आहे.

अतिदुर्गम मागासलेला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने यावर्षी परीक्षा शुल्कात केवळ 10 टक्के कपात केली आहे. ही कपात म्हणजे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांची थट्टा असून परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्के कपात करावी, याकरिता विद्यार्थ्यांनी अनेकदा निवेदने दिली.

परंतु कोणत्याही प्रकारची दखल विद्यापीठाने घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज शहरातील रस्त्यावर भीक मांगो आंदोलन करून गोंडवाना विद्यापीठाच्या सुविधा केंद्राजवळ निदर्शने केली. शुल्कामध्ये 50 टक्के कपात केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com