शाळा द्या, नाहीतर दाखले द्या; चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पंचायत समितीवर एल्गार

पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी आणि त्यांचे पालकांनी शहरातून पंचायत समितीवर मोर्चाचे काढला.
Buldana News
Buldana Newsसंजय जाधव

बुलडाणा : शेगाव (Shegaon) तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यासाठी खोली आणि मूलभूत सुविधा नसल्याने शेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकातून पंचायत समिती कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चात शाळा द्या, नाहीतर दाखले द्या, पंचायत समिती प्रशासन मुर्दाबाद, जिल्हा प्रशासन मुर्दाबाद, शिक्षण वाचवा देश वाचवा, अशा आक्रोशात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी शासनाप्रती रोष व्यक्त करीत हा मोर्चा काढून पंचायत समिती कार्यालयावर गटविकास अधिकाऱ्यांच्या केबिन समोर ठिय्या आंदोलन केले.

पाहा व्हिडीओ -

शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोळेगाव बुद्रुक येथील जि.प. शाळा (Z P School) वर्ग खोली आणि अंगणवाडी ही गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिशय शिकस्त झालेली आहे. या संदर्भात मुख्याध्यापक आणि अंगणवाडी सेविका यांनी तीन-चार वर्षांपासून खोली शिकस्त असून नवीन खोली मिळणे करिता कागदोपत्री पाठपुरवठा केलेला आहे.

परंतु अद्यापही खोली मंजूर झाली नाही. गोळेगाव बुद्रुक (Golegaon Budruk) येथील जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली मंजुर झाली होती. १० ऑक्टोंबर २०२१ रोजी जि.प. सदस्य राजाभाऊ भोजने यांनी सदर कामाचे भूमिपूजन सुद्धा केले होते. परंतु ही वर्गखोली गोळेगाव बुद्रुक ऐवजी येथील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे गोळेगाव खुर्द झाल्याने ती मंजुरात रद्द झाल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे.

Buldana News
Pune: मुख्यमंत्र्यांच्या नावाने उभारलेल्या वादग्रस्त उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द

यामुळे आज या गावातील पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी आणि त्यांचे पालकांनी शहरातून पंचायत समितीवर मोर्चाचे काढला. यावेळी शाळा द्या; नाहीतर दाखले द्या; अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. शेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ठाण मांडून आंदोलन केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com