We want justice घाेषणा देत विद्यार्थ्यांनी ठाेकलं महाविद्यालयास टाळे

कुलगुरूंच्या निर्देशनानुसार विद्यापीठाने चार प्राध्यापकांच्या उदगीर येथे बदलीचे आदेश काढले आहेत.
warud dugdh tantradnyan mahavidyalaya, yavatmal , students
warud dugdh tantradnyan mahavidyalaya, yavatmal , studentssaam tv

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद (pusad) नजिक असलेल्या वरूड येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकांची लातूर (latur) जिल्ह्यात बदली केल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास कुलूप ठोकले. तसेच बेमुदत आंदाेलनास (aandolan) प्रारंभ केला.

warud dugdh tantradnyan mahavidyalaya, yavatmal , students
Helmet Compulsion : एक मार्चपासून 'या' जिल्ह्यात हेल्मेटची सक्ती; RTO ने काढला आदेश

या आंदाेलनाबाबत विद्यार्थी म्हणाले आमच्या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांची लातूर जिल्ह्यातील उदगीर (udgir) येथे बदली करण्यात आली आहे. यामुळे सर्व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सर्वांनी मिळून प्राध्यापकांची झालेली बदली रद्द करावी यासाठी आंदाेलन छेडले आहे.

वरुड येथील हे पहिले शासकीय दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय आहे. सन २००८ मध्ये उदगीर येथे दुसरे महाविद्यालय उघडण्यात आले. वरुड येथे सध्या १७ प्राध्यापक कार्यरत आहेत. कुलगुरूंच्या निर्देशनानुसार विद्यापीठाने चार प्राध्यापकांच्या उदगीर येथे बदलीचे आदेश काढले आहेत. या निर्णयाच्या विराेधात विद्यार्थ्यांनी न्यायाच्या अपेक्षाने आंदाेलन छेडले.

warud dugdh tantradnyan mahavidyalaya, yavatmal , students
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारी उतरणार रस्त्यावर; चक्काजाम आंदाेलनाचा निर्धार

या प्राध्यापकांची बदली झाल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. भविष्यात आमच्या महाविद्यालयाची मान्यता रद्द हाेईल. त्यामुळे वरूडच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर जावे लागले. शासनाने तात्काळ प्राध्यापकांची बदली करावी. तसेच नव्याने भरती करावी अशी मागणी आंदाेलक विद्यार्थ्यांनी केली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com