खंडाळा घाटातील दरीत पडलेल्या युवकाला वाचवण्यात यश!

खंडाळा घाटातील शिंग्रोबा मंदिरा जवळून कारसह दरीत पडलेल्या युवकाला वाचविण्यात खोपोलीमधील अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संस्थेच्या युवकाना यश आले आहे.सागर सुरेश वावळे असं जखमी युवकाचे नाव आहे.
खंडाळा घाटातील दरीत पडलेल्या युवकाला वाचवण्यात यश!
खंडाळा घाटातील दरीत पडलेल्या युवकाला वाचवण्यात यश! दिलीप कांबळे

लोणावळा : खंडाळा घाटातील शिंग्रोबा मंदिरा जवळून कारसह दरीत पडलेल्या युवकाला वाचविण्यात खोपोलीमधील अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संस्थेच्या युवकाना यश आले आहे.सागर सुरेश वावळे असं जखमी युवकाचे नाव आहे. सागर हा फुटबाॅल खेळाडू आहे. फुटबाॅलचा नाईट सराव करण्यासाठी तो लोणावळा ते खोपोलीला नेहमी जात असतो.

हे देखील पहा -

मात्र, गुरुवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे त्याच्या मारुती झेन कार मधून जात असताना अचानक त्याच्या गाडीला मागून धडक बसल्याचा त्याला भास झाला आणि काही कळायच्या आतच त्याची गाडी उलटी पलटी होत थेट दरीत कोसळली. या घटनेची माहिती समजताच खोपोली महामार्ग पोलीस आणि येथील स्थानिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले.

खंडाळा घाटातील दरीत पडलेल्या युवकाला वाचवण्यात यश!
महिला बौद्ध भिक्खूचा अनैतिक संबंधातून खून!

रात्रीचा अंधार, पावसाच्या सरी आणि निसरडा झालेला कडा असं संकट समोर असताना देखील अपघातग्रस्तांच्या टिमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांनी दरीत उतरण्याचा निर्णय घेतला, रात्रीच्या किर्रर्र काळोखात आवाजावर लक्ष केंद्रित करून त्यांनी जखमी सागरचा शोध घेतला आणि त्याच्या जगण्याच्या आशा पल्लवित करून धिर दिला व काही मिनिटांत जखमी फुटबॉल पट्टू सागर ला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. जखमी सागरवर खोपोलीतील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. देव तारी त्याला कोण मारी, असंच काहीसं सागर बाबतीत घडलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com