Motivational Story : जिंकलस भावा तू ! तब्बल सात वर्षे परीक्षेत अपयश आलं, अंध रघुनाथनं हार मानली नाही... झाला बॅंकेचा अधिकारी

एखाद्या दुसऱ्या अपयशानं खचून न जाता प्रयत्नांवर विश्वास ठेवा. जिद्द आणि चिकाटी बाळगा यश तुमचच असल्याच रघुनाथनं म्हटलयं.
Raghunath Khot, Kolhapur News, Union Bank Manager
Raghunath Khot, Kolhapur News, Union Bank Managersaam tv

- रणजीत माजगावकर

Raghunath Khot News : आयुष्याला जन्मता अधंत्व.. घरची परिस्थिती बेताची.. मात्र शिकण्याची जिद्द मनाशी बाळगून त्यानं उच्च शिक्षण घेतलं.. आणि तब्बल सात वर्ष अपयश येवून सुध्दा खचून न जाता परिस्थितीवर मात करत त्या तरुणानं आय.बी.पी.एस. अंतर्गत घेण्यात आलेल्या बँकिंग परीक्षेत बँक अधिकारी पदावर आपली मोहर उमटवली. रघुनाथ मधूकर खोत (Raghunath Madhukar Khot) असं त्या अंध तरुणाच नाव आहे. (Maharashtra News)

Raghunath Khot, Kolhapur News, Union Bank Manager
Mumbai Goa Highway Toll News : 'या' कारणामुळे हातिवले टोलनाका बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय (पाहा व्हिडीओ)

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा (panhala fort) गडाच्या पायथ्याशी वसलेल्या वाघवे या गावात खोत कुटुंब राहतयं. मधूकर खोत यांची काैटुंबिक परिस्थिती अंत्यत हलाखीची. रघुनाथनं वाघवेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापुरात पदवीच शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यात डीएड पूर्ण केलं. तर त्याचा दुसरा भाऊ खाजगी काम करत कँलेंडर विक्रीचा व्यवसाय करतो. (kolhapur latest marathi news)

Raghunath Khot, Kolhapur News, Union Bank Manager
Grampanchyat चा अनोखा निर्णय; कर भरा... वर्षभर माेफत दळून न्या... (पाहा व्हिडीओ)

दरम्यान रघुनाथनं जीवनात काही तरी आपल्याला मिळवायचं आहे. या हेतूनं 2016 पासून आय.बी.पी.एस.अंतर्गत बँकिगच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. एक नव्हे , दोन नव्हे त्याला तब्बल सात वर्षे या परिक्षेत अपयश आलं.

मात्र रघुनाथनं हार मानली नाही. तर मोठ्या हिम्मतींने त्यानं परीक्षा देणं सुरूच ठेवलं आणि अखेर त्याच्या कष्टाला यश आलं. नुकतीच त्याची युनियन बँकेच्या अधिकारी पदी (union bank manager) निवड झाली.

Raghunath Khot, Kolhapur News, Union Bank Manager
Gautami Patil Dance : सबसे कातील गौतमी पाटीलला धक्का; असं काय घडलं की मागावी लागली माफी, जाणून घ्या कारण

एखाद्या दुसऱ्या अपयशानं खचून न जाता प्रयत्नांवर विश्वास ठेवा. जिद्द आणि चिकाटी बाळगा यश तुमचच असल्याच रघुनाथनं म्हटलयं.

एकीकडं देवानं सर्व काही देवूनसुद्धा एखाद्या दुसऱ्या समस्येमुळं विद्यार्थी आपल्या ध्येयापासून लांब जातात. काही जण तर नैराश्यातून टोकाच पाऊस उचलतात. तर दुसरीकडं दोन्ही डोळ्यांनी अंध असून ही परिस्थितीचा सामना करत रघुनाथनं उंच शिखर गाठलयं. त्यामुळे रघुनाथचा हा संघर्षमय परिस्थितीच भांडवल करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरणार हे नक्की.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com