तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश; केंद्र व राज्य सरकारकडून बैठकीचे निमंत्रण

हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय - रविकांत तुपकर
तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश; केंद्र व राज्य सरकारकडून बैठकीचे निमंत्रण
तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश; केंद्र व राज्य सरकारकडून बैठकीचे निमंत्रणSaam Tv

बुलढाणा : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचे गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन चालू होते. केंद्र व राज्य सरकारने रविकांत तुपकरांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा केली व यानंतर सोयापेंड देशात आयात करणार नाही. याबाबत पुढील आठवड्यात आदेश करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शरद पवार यांनी रविकांत तुपकरांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली व यासंदर्भात दिल्लीत चर्चा करू असे आश्वासन दिले. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनीही रविकांत तुपकरांशी फोनवरून चर्चा केली व तात्काळ केंद्रीय कृषीमंत्री व वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले.

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविकांत तुपकरांना दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी बैठकीचे निमंत्रण दिले व मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 24 नोव्हेंबरला ही बैठक पार पडणार आहे व या बैठकीला संबंधित खात्याचे मंत्री व सचिव उपस्थित राहणार आहे. दरम्यान राज्य सरकार व रविकांत तुपकरांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्ती केली. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया तुपकरांनी दिली आहे. शेतकरी व माध्यमांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com