सचिन वाजे दिशाभूल करीत असल्याचे समजायला मुख्यमंत्र्यांना सहा महिने लागले : मुनगंटीवार

राज्यातील काही अधिकारी व शिवसेनेतील काही नेते आजही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
सचिन वाजे दिशाभूल करीत असल्याचे समजायला मुख्यमंत्र्यांना सहा महिने लागले : मुनगंटीवार
सचिन वाजे दिशाभूल करीत असल्याचे समजायला मुख्यमंत्र्यांना सहा महिने लागले : मुनगंटीवारसंजय तुमराम

चंद्रपूर : अँटीलिया स्फोटक व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाजेने दिशाभूल केली असल्याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या खुलाशावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात टीकात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पहा :

दिशाभूल केली ही गोष्ट समजण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला, हे दुर्दैव असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. विधानसभेत वाजे हे ओसामा बिन लादेन आहेत का, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी बचाव केला होता, याची मुनगंटीवार यांनी आठवण करून दिली.

सचिन वाजे दिशाभूल करीत असल्याचे समजायला मुख्यमंत्र्यांना सहा महिने लागले : मुनगंटीवार
Corona : पुणे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक!

राज्यातील काही अधिकारी व शिवसेनेतील काही नेते आजही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. ही दिशाभूल मुख्यमंत्र्यांना समजेल त्यावेळेस महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असेल, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com