दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवर रोल नंबर टाकून पास झालेलं मविआ सरकार : मुनगंटीवार

धुळ्यात माजी मंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारने चोरी करून पेपर दिल्याचे उदाहरण देत टीका केली आहे.
दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवर रोल नंबर टाकून पास झालेलं मविआ सरकार : मुनगंटीवार
दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवर रोल नंबर टाकून पास झालेलं मविआ सरकार : मुनगंटीवार भूषण अहिरे

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवर आपला रोल नंबर टाकून उत्तीर्ण होऊ शकत नाही, आज ना उद्या ही चोरी पकडली जाईल आणि खरी उत्तर पत्रिका असणाऱ्याच्याच नावाने पुन्हा मार्कशीट प्रिंट आउट होईल असं महाविकास आघाडी सरकारवर टीकात्मक विधान केलं आहे.

हे देखील पहा :

मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी चोरी करून सत्ता मिळवली असल्याचे म्हणत आज ना उद्या ही चोरी पकडली जाऊन आपली सत्ता पुन्हा येईल असे परीक्षेचे उदाहरण देऊन भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा निर्धार व्यक्त केला आहे.

दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवर रोल नंबर टाकून पास झालेलं मविआ सरकार : मुनगंटीवार
महिला बौद्ध भिक्खूचा अनैतिक संबंधातून खून!

आज दोंडाईचा येथे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी मुनगंटीवार आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद संवाद साधताना आपल्या भाषणातून मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com