हे बंड आधीच व्हायला हवे होते; 'देर आये दुरुस्त आये'- सुधीर मुनगंटीवार

महाविकास आघाडी सरकार संदर्भातील घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
हे बंड आधीच व्हायला हवे होते; 'देर आये दुरुस्त आये'- सुधीर मुनगंटीवार
Sudhir MungantiwarSaam Tv

चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकार संदर्भातील घडामोडींवर भाजप (BJP) लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी दिली आहे. राज्यातील सरकार अस्थिर होऊन विकासाचे प्रश्न मागे पडत असतील तर त्यासंदर्भात काय करता येईल याबाबत विचारमंथन केले जात असल्याचे ते म्हणाले.

हे देखील पाहा -

भाजप- शिवसेना या पक्षांनाच जनतेने भरघोस मते देत सरकार चालवण्याची संधी दिली होती, याची आठवण करून देत शिवसेनेच्या मनात मात्र कपट आल्याने त्यांनी आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसशी घरोबा केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. राज्यात कुठल्याही पद्धतीने ऑपरेशन लोटस अथवा मिशन लोटस सुरू नसल्याचे मत मांडत या सरकारने केवळ स्वतःचे कल्याण केल्याची टीका त्यांनी केली. हे बंड आधीच व्हायला हवे होते, असे सांगत 'देर आये दुरुस्त आये' अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली.

Sudhir Mungantiwar
आम्ही सत्तेसाठी कधीही…”; एकनाथ शिंदेंचं बंडानंतर पहिलं ट्विट

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सेनेच्या सुमारे 17 आमदारांसह सूरतला गेल्याचे समजते. या घडामोडीनंतर राज्यात मोठी राजकीय खळबळ समोर आली आहे. तसेच शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची काही मतं फुटल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com