काँग्रेसने भगतसिंग यांची फाशी थांबवण्यासाठी काय केले? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

शहीदे आजम भगतसिंग यांची फाशी थांबवण्यासाठी काँग्रेसने काहीही केले नाही हा इतिहास आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwarsaam tv

चंद्रपूर - राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्यावर टीकेचा भडीमार होत असताना आता दुसरीकडे या वादात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी काल ट्विट करत महात्मा गांधींना मारण्यासाठी नथ्थुराम गोडसे यांना सावरकरांनी बंदूक पुरवली होती, असं खळबळजनक ट्विट तुषार केलं होत. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्थरातून टीका होताना दिसत आहे. तुषार गांधी यांनी केलेल्या या व्यक्तव्यावर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sudhir Mungantiwar
Tushar Gandhi : महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेंना बंदूक पुरवली; तुषार गांधींचं खळबळजनक ट्विट

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नथ्थुराम गोडसे यांना सावरकरांनी बंदूक पुरवली होती हे काँग्रेसला आज का सुचलं असा सवाल केला आहे. तुम्ही हे कोर्टात का मांडलं नाही असा प्रश्न करत सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्याला दिलेली प्रेरणा काँग्रेसला (Congress) कधीच रुचली नाही असे मत व्यक्त केले. शहीदे आजम भगतसिंग यांची फाशी थांबवण्यासाठी काँग्रेसने काहीही केले नाही हा इतिहास आहे. मात्र अफजल गुरु या दहशतवाद्याची फाशी थांबवण्यासाठी धावाधाव केल्याचा दाखला त्यांनी दिला.

काय म्हणाले तुषर गांधी?

महात्मा गांधींना मारण्यासाठी नथ्थुराम गोडसे यांना सावरकरांनी बंदूक पुरवली होती, असं खळबळजनक ट्विट तुषार गांधी यांनी केलं. इतकंच नाही तर, 'सावकरकर यांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंना मारण्यासाठी नथ्थुराम गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्यासाठी सु्द्धा मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथ्थुराम गोडसेकडे कुठलंही शस्त्र नव्हतं', असा आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com