
Sudhir Mungantiwar On Morning swearing : 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी होता असे मुनगंटीवार म्हणाले.
'2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अवमान केला, निवडणूक आमच्यासोबत लढली आणि नंतर विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते, गनिमी गावा होता.उद्धव ठाकरे यांना धडा शिवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता' असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
अजित पवार-देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती शपथ
2019 मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हे सरकार अवघ्या काही तासांत कोसळले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. या शपथविधीविषयी सध्याचे शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी गौप्यस्फोट केला होता. या शपथविधीची कल्पना शरद पवार यांना होती, असा दावा फडणवीस यांनी केला होता. (Latest Breaking News)
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला होता. तसेच या शपथविधीची शरद पवारांना कल्पना होती, आम्ही शपथ घेणार हे त्यांना माहित होतं असा गौपस्फोट फडणवीस यांनी केला होता. तसेच शरद पवारांच्या संमतीनेच सगळं झालं होतं असा दावा देखील फडणवीस यांनी केला होता. (Latest Political News)
संजय राऊत यांचा पलटवार
देवेंद्र फडणवीस यांच्या या मोठ्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेच्या शपथविधीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानतंर संजय राऊथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'त्यांच्याच पक्षात त्यांना कोणी विचारत नाही आणि आम्हाला काय सांगताय' असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.