Nashik : अफगाणिस्ताच्या सुफी धर्मगुरुची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

नाशिकमध्ये (Nashik) सुफी धर्मगुरूची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या येवला येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूची हत्या झाली.
nashik Crime news
nashik Crime news saam tv

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) सुफी धर्मगुरूची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या येवला येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूची हत्या झाली. या हत्येचा प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ( Nashik Crime News In Marathi )

nashik Crime news
उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी आरोपींच्या घरासह १७ ठिकाणी NIA ची छापेमारी

अफगाणिस्तानी (Afghanistan) सुफी धर्मगुरू हे येवला येथे राहत होते. ३५ वर्षीय मुस्लिम धर्मगुरू अहमद चिस्ती यांची चार अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून हत्या केली. आरोपींनी हत्या करून घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासात पोलिसांना मोठी माहिती हाती लागली आहे.

या मुस्लिम धर्मगुरूची त्यांच्या चालकाने हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. संपत्ती आणि पैशावरून मुस्लिम धर्मगुरू अहमद चिस्ती यांची हत्या झाल्याचं प्राथमिक माहितीत उघड झालं आहे. ही हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

nashik Crime news
Wardha : मुसळधार पावसाचा कुक्कुटपालन व्यवसायाला फटका; आर्वी तालुक्यात १० हजार कोंबड्यांचा मृत्यू

अहमद चिस्ती असे मुस्लिम धर्मगुरूंचे नाव आहे. मात्र, विभागातील लोक त्यांना सुफी बाबा म्हणून ओळखायचे. गेल्या चार वर्षांपासून ते भारतात राहत होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी देखील राहत होती. केंद्र शासनाच्या परवानगीने रेफुजी म्हणून त्यांना भारतात राहण्याची परवानगी मिळाली होती. त्यांचं स्वत:चं यु-ट्यूब चॅनल होतं. त्या माध्यमातून ते धर्माबद्दलची माहिती द्यायचे. त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स होते.

त्यामुळे यु-ट्यूबच्या माध्यमातून त्यांची मोठा प्रमाणात पैसा मिळत होता. त्यामुळे त्यांनी जमीन घ्यायची होती. मात्र,रेफूजी असल्याने त्यांच्या नावाने जमीन घेता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने जमीन घेतली. मात्र, या जमीनीवर त्यांच्यात वाद झाले. या वादातून सुफी धर्मगुरूची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अशी पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com