साखर कामगारांची दिवाळी गोड, फरकासह मिळणार घसघशीत पगारवाढ

साखर कामगारांची दिवाळी गोड, फरकासह मिळणार घसघशीत पगारवाढ
Money

अहमदनगर : गेल्या काही वर्षांपासून उस उत्पादक शेतकरी तसेच कामगारांमागेही शुक्लकाष्ट लागले आहे. परंतु राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला हा प्रश्न पवार यांच्यामुळे मार्गी लागला आहे. विशेष म्हणजे कामगारांना एप्रिल २०१९ पासून पगारवाढीचा प्रश्न खोळंबला होता.

साखर कामगारांना १२ टक्के पगारवाढीची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती त्रिपक्षीय समितीचे सदस्य राजेंद्र नागवडे यांनी दिली. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुलात (पुणे) झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेंद्र नागवडे, कल्लाप्पा आवाडे, चंद्रदीप नरके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, कामगार संघटनेचे प्रतिनिधी तात्यासाहेब काळे, आनंदराव वायकर उपस्थित होते. Sugar workers to get 12 per cent pay hike per month abn79

Money
आता माघार नाही, ठाकरे सरकारविरोधात अण्णांचे रणशिंग!

नागवडे म्हणाले, की राज्यातील साखर कामगारांचा पगारवाढीचा २०१४मध्ये झालेला करार ३१ मार्च २०१९ रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे एप्रिल २०१९ पासून नवीन करार करून साखर कामगारांच्या पगारवाढीची मागणी कामगारांनी केली होती. त्यानुसार यावर योग्य तोडगा काढून शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने मालक प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी, अशी राज्यस्तरीय पक्षसमिती स्थापन करून समितीस पगारवाढीसंदर्भात शिफारस करण्याची सूचना केली होती. Sugar workers to get 12 per cent pay hike per month abn79

त्यानुसार गेले सहा महिने समितीच्या बैठका होत होत्या. तथापि, त्यात कुठलाही निर्णय होत नव्हता. शेवटी निर्णयप्रक्रियेमध्ये शरद पवार यांनी मध्यस्थी करून साखर कामगारांना एप्रिल २०१९ पासून बारा टक्के पगारवाढ देणे व इतर मागण्या मान्य करून यशस्वी तोडगा काढला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com