'आम्हाला 'मातोश्री'वर बोलावलं तर...'; बंडखोर आमदार सुहास कांदे यांचं मोठ वक्तव्य

आम्हाला आजही मातोश्रीवर बोलवावे असे वाटते. परंतु बोलावलं तर एकटा जाणार नाही, सर्वजण सोबत जाऊ, असे वक्तव्य नांदगाव मतदारसंघाचे बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केलं.
uddhav thackeray and suhas kande
uddhav thackeray and suhas kande saam tv

मोबीन खान

अहमदनगर : आम्हाला आजही मातोश्रीवर बोलवावे असे वाटते. परंतु बोलावलं तर एकटा जाणार नाही, सर्वजण सोबत जाऊ, असे वक्तव्य नांदगाव मतदारसंघाचे बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केलं. कांदे हे शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सपत्निक दर्शनासाठी आले होते. ( Maharashtra Political News In Marathi )

uddhav thackeray and suhas kande
Ashadhi Wari 2022 : वारकऱ्यांसाठी CM एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वच बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. आमदार सुहास कांदे देखील मतदारसंघात परतले. त्यानंतर कांदे हे सपत्निक साईबाबा मंदिरात दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कांदे म्हणाले, 'आम्ही गुवाहाटीत होतो, त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना साईबाबांना केली होती. बाबांनी माझ्या झोळीत भेट टाकली आणि मला न्याय दिला. त्यामुळे साईबाबांचे आभार मानण्यासाठी सपत्निक दर्शनासाठी आलो, अशी प्रतिक्रिया नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी शिर्डी येथे बुधवारी दिली. आम्हाला आजही मातोश्रीवर बोलवावे असे वाटते, परंतु बोलावलं तर एकटा जाणार नाही, सर्वजण सोबत जाऊ, असे वक्तव्य कांदे यांनी केलं.

uddhav thackeray and suhas kande
Beed : 'रानबाजार' वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात; पोलिसांत तक्रार दाखल

'महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुक्त व्हावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या माध्यमातून राज्याचा विकास व्हावा, अस‌ साकडं साईबाबांना घातलं. मला मंत्रीपदाची जबाबदारी देवो, माझा माणूस ज्यांच्यावर मी खुप प्रेम केले, त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं आहे, आता साईबाबा हे जी जबाबदारी देतील, ती मी स्वीकारेल असं देखील कांदे यांनी म्हटलं आहे.

'आमची खदखद ही संजय राऊतांवर नव्हती, विकास कामावरच होती. मात्र, ज्या चाळीस मतांवर संजय राऊत खासदार झाले, त्यांनाच राऊतांनी रेडा , डुक्कर अस म्हटलं. ते मोठे आणि ज्येष्ठ आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत', असा खोचक टोला आमदार कांदे यांनी राऊतांना लगावला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com