पोलिसांच्या जाचामुळे युवकाने घेतली फाशी

पोलिसांच्या जाचामुळे युवकाने घेतली फाशी
क्राईम लोगो

अहमदनगर : शेवगाव तालुक्यात पोलिसांच्या जाचामुळे एका तरूणाचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांमुळे पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची शक्यता आहे. मृताच्या आई-वडिलांनी पोलिसांबद्दल केलेल्या आरोपांमुळे वातावरण चिघळले होते. परंतु वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनामुळे तणाव निवळला असला तरी पोलिसांकडील संशयाची सुई तशीच कायम आहे.

एका गुन्ह्यात तरूणाला ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्याला सोडून दिले. परंतु त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर नातेवाइकांनी मृतदेहासह शेवगाव पोलिस ठाण्यासमोर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. Suicide of a youth due to police harassment

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी संबंधित पोलिसांची चौकशीचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

या बाबत समजलेली माहिती अशी ः आदित्य अरुण भोंगळे (वय १८, रा. बालमटाकळी) हा आई संगीतासह शनिवारी (ता. ४) शेतात काम करीत होता. यावेळी शेवगाव पोलिस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांनी एका गुन्ह्यात संशयित म्हणून त्यास ताब्यात घेतले. चौकशी करून रविवारी (ता. ५) दुपारी त्यास सोडून दिले. त्याने मंगळवारी रात्री आत्महत्या केली.

पोलिसांनी कारवाईची भीती दाखवत त्याच्याकडून रोख ४३ हजार रुपये घेतले. दोन हजार रुपये ऑनलाइन देण्यास भाग पाडले. त्याला मारहाणही केली होती. पोलिसांनी मानसिक छळ केल्यानेच मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे.

नातेवाइकांनी काल (बुधवारी) दुपारी दोन वाजता मृतदेह थेट पोलिस ठाण्यात नेला. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती. गोंधळामुळे निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या आश्वासनानंतर पोलिसांनी बालमटाकळी येथे अंत्यसंस्कार केले.Suicide of a youth due to police harassment

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com