'राजमातांनी बाबासाहेबांना शिवशाहीर पदवी बहाल केली हाेती'

'राजमातांनी बाबासाहेबांना शिवशाहीर पदवी बहाल केली हाेती'
babasaheb purandare with rajmata sumitraraje bhonsle

सातारा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे shivshahir Babasaheb Purandare यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह देशातील मान्यवर आपल्या भावना व्यक्त करीत त्यांना अदारांजली वाहत आहेत. खासदार उदयनराजे भाेसले Udayanraje Bhosale यांनी बाबासाहेबांना अदारांजली वाहताना त्यांचे काळाच्या पडदयाआड जाणे मनाला चटका लावणारे आहे. सातारच्या छत्रपती घराण्याशी त्यांचा वेगळाच ऋणानुबंध होता असे सांगून शिवशाहीर ही पदवी आमच्या आजी (कै.) राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले Sumitraraje Bhosale यांनीच त्यांना सातारा येथे सन्मानाने बहाल केली होती अशी आठवण सांगितली.

खासदार उदयनराजे भाेसले म्हणाले इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे अतिव दुःख होत आहे. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत बाबासाहेबांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. या जगविख्यात इतिहासकाराने कठोर परिश्रमाने आणि प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी अविरत प्रयत्न केले. सातारच्या छत्रपती घराण्याशी त्यांचा वेगळाच ऋणानुबंध होता.

babasaheb purandare with rajmata sumitraraje bhonsle
दातृत्व; रिक्षाचालकास महिलेने दिली एक कोटी रुपयांची संपत्ती

शिवशाहीर ही पदवी आमच्या आजी (कै.) राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनीच त्यांना सातारा येथे सन्मानाने बहाल केली होती. सन १९८५ मध्ये जाणता राजा हे महानाटय मंचकावर आणुन बाबासाहेबांनी अव्दितिय कार्य केले. त्यांचे काळाच्या पडदयाआड जाणे मनाला चटका लावणारे आहे असे म्हटलं आहे.

खरतर आज बोलायला शब्दच नाहीत. इतिहास अभ्यासक्षेत्राचे तर कधीही भरुन न येणारे नुकसान त्यांच्या एक्झीटमुळे झाले आहे. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्यावतीने सहभागी आहोत अशी भावना खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com