कोकण रेल्वे व महामार्ग अधिकाऱ्यांना सुनिल तटकरेंनी सुनावले खडे बोल

सुनिल तटकरे यांनी माणगांव तहसील कार्यालय येथे माणगांव तालुक्यात होणाऱ्या महामार्ग व कोकण रेल्वेच्या कामांची तसेच विकासकामांची आढावा बैठक घेतली.
कोकण रेल्वे व महामार्ग अधिकाऱ्यांना सुनिल तटकरेंनी सुनावले खडे बोल
कोकण रेल्वे व महामार्ग अधिकाऱ्यांना सुनिल तटकरेंनी सुनावले खडे बोल दिनेश पिसाट

दिनेश पिसाट

रायगड: रायगड-रत्नागिरी लोकसभा ३२ चे खासदार सुनिल तटकरे Sunil Tatkare यांनी माणगांव तहसील कार्यालय येथे माणगांव तालुक्यात होणाऱ्या महामार्ग व कोकण रेल्वेच्या Kokan Railway कामांची तसेच विकासकामांची आढावा बैठक घेतली. Sunil Tatkare reviewed the work and development work of Konkan Railway

माणगांव Mangaon शहरातून मुंबई गोवा महामार्ग, दिघी पुणे महामार्ग व कोकण रेल्वेचे काम सुरू आहे. ही कामे चालू असताना अनेक ठिकाणी भरावकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते खा. तटकरे यांनी कोकण रेल्वे मुख्य अभियंत्याला बोलावून कचेरी रोडवरील रेल्वे ट्रॅकवर १ किमी फिरून पाहणी केली .

हे देखील पहा-

या वेळी पाणी जाण्यासाठी नाले बांधा आणि पर्यायी व्यवस्थ करा असे सक्तीचे आदेश दिले. या आधी दोन वेळा पाहणी करून सुद्धा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. ह्या वेळेस काम नियोजित पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण न केल्यास रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही खा. तटकरे यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना दिला. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न केल्यास केंद्रीय मंत्री गडकरींसमोर Nitin Gadkari सुनावणार असेही त्यांनी सांगितले आहे. Sunil Tatkare reviewed the work and development work of Konkan Railway

कोकण रेल्वे व महामार्ग अधिकाऱ्यांना सुनिल तटकरेंनी सुनावले खडे बोल
इस्त्रायलने चक्क मराठीत ट्विट करत मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; समुद्राचं पाणी गोड होणार!

तर मुंबई गोवा महामार्गावर जिथे जिथे अपघात होण्याची शक्यता आहे. तिथे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी. तसेच दिघी-पुणे महामार्गावर निजामपूर रोड येथे सुद्धा पाणी साचते. त्याचे ही नियोजन लवकरात लवकर करण्यात यावे. अश्या सूचना MSRDC च्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com