अखेर पायी वारी नाहीच; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली वारकऱ्यांची याचिका

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे.
अखेर पायी वारी नाहीच; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली वारकऱ्यांची याचिका
अखेर पायी वारी नाहीच; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली वारकऱ्यांची याचिका Saam tv

पंढरपूर :

कोरोनाचं (Corona Virus) संकटाची तीव्रता कमी झाली असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं ठाकरे सरकारने यंदाही पायी वारीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरून विरोधकांकडून निशाणा साधला जात असून, पंढरपूरची वारी आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. ‘पायी वारी’ (Ashadhi Wari) संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने कोरोनाचे कारण देत याचिका फेटाळली. (The Supreme Court rejected the petition of Warkaris)

अखेर पायी वारी नाहीच; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली वारकऱ्यांची याचिका
रायगड जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू; तर तीन जण गेले वाहून, शोध सुरू

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. व्ही. रामना यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. राज्यभरात एकूण २५० पालख्या नोंदणीकृत आहेत. मात्र राज्यसरकारने यंदाच्य़ा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी दिली. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. या निर्णयाला आव्हान देत वारकरी सांप्रदायाने सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यासंर्दभात आज न्यायालायात सुनावणी झाली. न्यायाधीश एन.व्ही. रामना यांनीदेखील राज्यातील तिसऱ्या लाटेचा आणि डेल्टा प्लस व्हेरीयंटच्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर वारकऱ्यांची याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, आषाढी यात्रेसाठी पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या परिसरातील १० गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आषाढी यात्रेला वारकऱ्यांनी येऊ नये, यासाठी पंढरपूरकडे येणारे सर्व ४८ मार्ग बंद करण्यात आले असून या मार्गांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तर विठ्ठल मंदिर परिसर पुर्णपणे सील करण्यात आला असून मंदिर परिसराला जोडणारे सर्व मार्ग लोखंडी बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आले आहेत. यावर्षी पंढरपुरात केवळ ४०० वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे ३ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com