खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !

जात प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती.
खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !
खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !Saam Tv

अरुण जोशी

अमरावती : मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणावर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देऊन खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. Supreme Court consoles Navneet Rana

सर्वोच्च न्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देताच युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात एकच जल्लोष केला. ढोल ताशे आणि फटाके फोडून आणि एकमेकांना लाडू खाऊ घालून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

हे देखील पहा -

अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार करून निवडणूक लढविल्याचा खटला दखल केला होता. त्यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती.

खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !
कोरोनात श्रीमंतीची व्याख्या जाणवली - सयाजी शिंदे

मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिल्याने पुढील निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या.

त्यामध्ये पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती. तर दुसरी याचिका ही लोकसभा निवडणूकी दरम्यान केलेल्या जात प्रमाणपत्राबाबतची होती. यामधील २०१७ च्या याचिकेवर निकाल देत खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com