Supreme Court of India: प्रजासत्ताक दिनापासून सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय प्रादेशिक भाषेत उपलब्ध; सरन्यायाधीशांची घोषणा

आज (26 जानेवारी 2023) पासून सर्व प्रदेश भाषेत निकाल देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सुरुवात केली आहे.
Supreme Court of India
Supreme Court of IndiaSaam TV

Supreme Court of India: सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आता विविध प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार आहेत. आज (26 जानेवारी 2023) पासून सर्व प्रदेश भाषेत निकाल देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सुरुवात केली आहे. काल (बुधवारी) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रजासत्ताक दिनापासून ही सेवा पुरवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. (Latest Supreme Court of India News)

सर्वोच्च न्यायालयातील इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालय अहवाल प्रत्येक प्रादेशिक प्रदेशातील अनुसूचित भारतीय भाषांमध्ये सुरू होत आहे. यामध्ये नायायल्यात होणारे न्यायनिवाडे त्यातील सुनावणी या सर्व गोष्टी त्या त्या भाषेत विनामूल्य पुरवल्या जाव्यात, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांना सांगितले आहे.

'इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालय अहवाल' (ESCR) मार्फत सर्व भाषेत निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात एकूण ३४ हजार निर्णय उपलब्ध आहेत. तसेच प्रादेशिक भाषेत एक हजार ९१ निवाडे आहेत. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हे सर्व काही सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Supreme Court of India
Kaali Poster Cotroversy: चित्रपट निर्मातीने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार, एफआयआर रद्द करण्याची केली मागणी; काय झालं नेमकं कोर्टात?

ESCR प्रकल्पात मराठीमध्ये १४, कन्नडमध्ये १७, नेपाळीमध्ये ३, तामिळमध्ये ५२, उर्दूत ३ आणि उडिया भाषेत २१, आसामीमध्ये ४, मल्याळममध्ये २९, पंजाबीमध्ये ४, तेलुगूमध्ये २८ तीन निकाल देण्यात आले आहेत.

Supreme Court of India
Shambhuraj Desai : सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य - देसाई

तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वच भाषेत निकाल देण्यात येण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मोबाईल अॅपमध्ये देखील तुम्ही निकाल पाहू शकता. याचा फायदा कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील होणार आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com