Supriya Sule on New Parliament Building: ...तर आम्ही नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला गेलो असतो; सुप्रिया सुळेंनी सांगितलं न जाण्यामागचं कारण

Sulpriya Sule News Today: सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं आहे. आपल्या देशात राज्यसभा आहे की नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल
Supriya Sule on New Parliament Building
Supriya Sule on New Parliament BuildingSaam Tv

अक्षय बडवे

Supriya Sule News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 मे) दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते. पण राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही. त्यावरून राष्ट्रादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होत आहे, परंतु तुम्ही गेला नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, आम्हाला ३ दिवसांपूर्वी कमिटी मेंबर म्हणून उद्घाटनाचा व्हॉट्सअपवर मेसेज आला. लोकसभा संसद आमच्यासाठी मंदिर आहे. संसद चालवायची सर्व जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते.

Supriya Sule on New Parliament Building
MLA Lata Sonawane Car Accident: शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणेंच्या कारला भरधाव डंपरने दिली धडक; अपघातातून थोडक्यात बचावल्या

एरव्ही बिल पास करायचे असतात तेव्हा सर्व मोठे मंत्री, नेते या देशातली विरोधी पक्ष नेत्यांना फोन करतात. काम असलं की मंत्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करतात ग आता फोन का केला नाही? फोन केला असता तर सगळे गेलो असते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Political News)

विरोधी पक्ष नसल्याने हा कार्यक्रम अपूर्ण असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही तोच आग्रह होता. हे संविधानातही आहे. अशावेळी तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नसेल तर कार्यक्रम अपूर्ण आहे, असंही त्या म्हणाल्या.

Supriya Sule on New Parliament Building
Mumbai News : पतीपेक्षा जास्त कमावणाऱ्या पत्नीला पोटगी देण्याची गरज नाही, मुंबई सत्र न्यायलयाचा मोठा निर्णय

'उपराष्ट्रपतींनाही बोलवायला पाहिजे होतं'

ओम बिर्ला यांनी बोलावले त्यांचे स्वागत पण उपराष्ट्रपती यांना बोलवायला हवे होते. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. या सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं आहे. आपल्या देशात राज्यसभा आहे की नाही? या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींना बोलवायला हवं होतं. परंतु हा कार्यक्रम एका व्यक्तिचा आहे की, देशाचा तेच कळत नाही असा टोलाही सुळे यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com