लावणी सम्राज्ञीची निवडणूक लढण्याची इच्छा; शिवसंग्रामकडे तिकीटाची मागणी

देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे.
लावणी सम्राज्ञीची निवडणूक लढण्याची इच्छा; शिवसंग्रामकडे तिकीटाची मागणी
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरSaam Tv

नांदेड: महाराष्ट्रात लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघातून पुणेकर निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्याकडे तशी मागणी केली आहे.

देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे. आता तर थेट लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने या निवडणूकीत आणखीनच रंगत येणार असल्याची चर्चा सुरेखा पुणेकर यांच्या चहात्यांत आहे. पुणेकर आज नांदेड मध्ये बोलत होत्या.

सुरेखा पुणेकर यांनी काल देगलूर मतदार संघात दौरा केला आणि आज त्यांनी नांदेडमध्ये सुरेखा पुणेकर यांनी निवडणूक लढविणार असून या देगलूरला घर करणार आहे आणि या भागातील समस्या जाणून घेणार आहे. शिवसंग्राम पक्षाने तिकीट दिल्यास आपण निवडून येऊन मतदार संघात विकास कामे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com