Nandurbar : सूर्यकन्या तापीमाता नदीपात्राची स्वच्छता करत वृक्ष लागवडीची मोहीम
Suryakanya Tapi Mata Nandurbar : दिनू गावित

Nandurbar : सूर्यकन्या तापीमाता नदीपात्राची स्वच्छता करत वृक्ष लागवडीची मोहीम

Suryakanya Tapi Mata Nandurbar River: या समाजाउपयोगी सेवेसाठी जिल्ह्याभरातून जवळपास दोन हजारांच्या वर संख्येने सेवेकरी उपस्थित होते.

नंदूरबार: श्री स्वामी समर्थ सेवा आणि अध्यात्मिक केद्र नंदुरबार (Nandurbar) तर्फे प्रकाशा येथील प्रतिकाशी तीर्थक्षेत्रातील सूर्यकन्या तापीमाता नदीपात्राची (Suryakanya Tapi Mata) संपूर्ण स्वच्छता करुन स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच जमा झालेल्या कचऱ्यातून कंपोस्ट खताचे नियोजन करण्यात आले. नदी काठावर पाणी शुध्द करणाऱ्या आणि प्रदूषण (Pollution) कमी करणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्यात आली. तसेच वृक्षारोपण करुन पर्सावरण स्वच्छता आणि प्रदुषणमुक्त परिसर करण्याची सेवा करण्यात आली. (Suryakanya Tapimata Tree planting campaign cleaning the river basin in nandurbar)

हे देखील पाहा -

Suryakanya Tapi Mata Nandurbar :
'शिवसेना जात-पात मानत नाही'; सेनेचा औरंगाबादच्या सभेचा दुसरा टीझर प्रसिद्ध

जिल्ह्यात ओला किंवा सुका दुष्काळ पडू नये म्हणून तापीमातेला साडीचोळी, श्रृंगार व अलंकार अर्पण करुन संकल्पयुक्त मानसन्मान करण्यात आला. पर्जन्य देवतेची सेवा म्हणून पर्जन्य सुक्ताचे वाचन करुन अभिषेक करण्यात आला. या समाजाउपयोगी सेवेसाठी जिल्ह्याभरातून जवळपास दोन हजारांच्या वर संख्येने सेवेकरी उपस्थित होते. समाजभिमुक कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा संस्कार विभागातील व इतर सर्व सेवेकरी यांनी मोलाची सेवा व सहकार्य केले.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com