
अभिजीत देशमुख
कल्याण : शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कल्याणच्या विनायक डायरे यांच्या कुटुंबीयांची सुषमा अंधारे यांनी भेट घेतली. डायरे यांच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंधारे यांनी सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा पुनरुच्चार केला. (Latest Marathi News)
डायरे कुटुंबाची भेट घेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमच्या कुटुंबाच्या पाठिशी उभा असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी आम्ही तीन मागण्या करत असल्याचे सांगितले.
'पहिली मागणी ही की मूळ युआरएल आहे ,आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या अकाउंटवरून फेसबुक लाईव्ह झालं आणि नंतर ते डिलीट झालं. ते सायबरने रिकव्हर केलं पाहिजे. दुसरी मागणी जर व्हिडिओ मॉर्फ आहे तर ओरिजनल व्हिडिओ (Video) दाखवलाच गेला पाहिजे. तिसरी गोष्ट एसआयटी नेमायची असेल, तर ती उच्च न्यायालयाच्या आखत्यारीत नेमली पाहिजे असे सांगितले.
'पहिला व्हिडियो अपलोड करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी या कुटुंबाला देखील संरक्षण मिळण्याची गरज आहे. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही सत्तेचा गैरवापर करू शकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
'सामान्य नागरिक सांगत असतील धमकवल्याचा सांगत असेल तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकते, गृहमंत्र्यांनी याचा जरा विचार करावा. गृहमंत्री आपण एका पक्षाचे नाहीत आपण महाराष्ट्राचे आहात, असं म्हणत अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला
तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी; सुषमा अंधारे यांचा टोला
शीतल म्हात्रे यांनी दुचाकीवरून अज्ञात इसमांनी पाठलाग करत असल्याची तक्रार केली. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत असल्याचा टोला लगावला.
'इतक्या मोठ्या चर्चेत असणाऱ्या व्यक्तीचा जर पाठलाग होत असेल तर गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलं आहे. तात्काळ मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्र्यांना आदेश देऊन त्यांच्याकडून खातं काढून घेतलं पाहिजे हे सगळे चुकीचे होत आहे, असा टोलाही अंधारे यांनी लगावला
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.