
Nagpur News: कर्नाटक निवडणुकीचे कल हाती आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने कर्नाटकात बहुमताचा आकडा पार केला आहे. कर्नाटकात राहुल गांधी जादू चालली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा घटला अशी चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कर्नाटक निवडणुकीवरून भाजपला 'पप्पू पास नही हो गया; मेरिट में आ गया', अशा शब्दात टोला लगावला आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना अंधारे यांनी कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. अंधारे म्हणाल्या, 'महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. कर्नाटकचे निकाल हे एकूणच देशभरामध्ये 'मोदी है तो मुनकीन है' असे म्हणनारे लोक होते. त्या सर्व भक्तांसाठी चपराक आहे'.
'सर्वांसाठी हा ऊर्जादायी निकाल आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रचंड नकारात्मक राजकारण, ऊर्जा केली होती. त्याला सर्व कंटाळले आहेत. कर्नाटकमधील निकालाची विजयाची ऊर्जा ही महाराष्ट्रात दिसेल, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
' राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेलने पप्पू म्हणून हिणवलं. तेच राहुल गांधी हे सर्वांचे बाप निघाले. राहुल गांधी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आणि राहुल गांधींच काय तर जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट में आ गया, अंधारे पुढे म्हणाल्या.
दरम्यान, सुषमा अंधारे यांची नागपुरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत हॉटेल रेडिसनच्या लॉबीत अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये कर्नाटकाच्या निवडणुकीवरून चर्चा झाली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.