९ कोटी ५६ लाखांच्या वसूलीत ढिलाई; महावितरणचा अभियंता निलंबित

९ कोटी ५६ लाखांच्या वसूलीत ढिलाई; महावितरणचा अभियंता निलंबित
mahavitran

सिंधूदूर्ग : कणकवली तालुक्यातील काेट्यावधी रुपयांची थकीत वीज बिल वसूल न केल्याच्या कारणास्तव कणकवली येथील वीज वितरणचे mahavitran सहाय्यक अभियंता संतोष नलावडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान कणकवली तालुक्यात ११ हजार ग्राहकांची मोठी थकबाकी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांची वसूली झाल्यास विद्युत मंडळाच्या खजिन्यात चांगली रक्कम जमा हाेईल असा अंदाज बांधला जात आहे.

mahavitran
पैसे नसल्याने दाेन लाख ७६ हजार ९५० ग्राहकांनी थकविले वीज बिल

कणकवली तालुक्यात नऊ कोटी ५६ लाख थकीत वीज देयक प्रकरणी सहाय्यक अभियंता संताेश नलावडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. खरंतर गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा थकबाकी वसुली सुरू होती. परंतु तरी थकबाकी पूर्ण होऊ शकली नाही.

दरम्यान नलावडे यांना आठवड्यातून दोन वेळा सावंतवाडी कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली. याबराेबरच नागरिकांनी वीज बिल थकीत ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.