सांगलीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन

सांगलीच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी तासगाव येथे काल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
सांगलीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन
सांगलीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलनविजय पाटील

विजय पाटील

सांगली: सांगलीच्या Sangali तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी तासगाव येथे काल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या Swabhimani Shetakari Sanghtna वतीने खासदार संजयकाका पाटील Sanjaykaka Patil यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. तर आज ठिय्या मारलेल्या शेतकऱ्यांनी तासगाव शहरातून भीक मागितली आणि घरोघरी भाकरी मागून आंदोलकांनी जेवण केले.

हे देखील पहा-

तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. काल खा संजयकाका पाटील यांच्या मार्केट यार्ड Market Yard तासगाव येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाटील यांनी आणखी एक महिन्याची मुदत मागितली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि सर्व शेतकर्यानी बिल मिळाल्याशिवाय कार्यालयासमोरील हलयाचे नाही असा निर्धार करून ठिय्या मारला आहे.  

सांगलीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन
सात नवजात बालकांचा मृत्यू! रायपूरमधील घटना

आज तासगाव शहरातील प्रमुख गल्ल्यातून भीक मागण्यास प्रारंभ करण्यात आली. घरोघरी भीक मागण्यात आली भाकरी, चपाती, पोळी चटणी ,भाज्या मिळेल ती भीक मागण्यात आली.. लोकांनीही प्रतिसाद दिला.. यावेळी पोलीस अधिकारी आले त्यांनी प्रतिबंध केला त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्याच्या मध्ये किरकोळ बाचाबाची झाली.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com