आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले : खाेत; ऐतिहासिक विजय : शेट्टी

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदाबाबत माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत
आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले : खाेत; ऐतिहासिक विजय : शेट्टी
sadabhau khot raju shetti

सातारा : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आज तिन्ही कृषी कायदे मागे 3 Farm Laws To Be Cancelled घेण्याची केलेली घोषणा ही शेतक-यांच्या स्वातंत्र्य हिरावून घेतल्या सारखे झाल्याचे शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत यांनी नमूद केले. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हा एेतिहासिक विजय झाल्याचे नमूद केले. याबराेबरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

sadabhau khot raju shetti
२ दिवसात जुळणी हाेईल; 'महाविकास'च्या सतेज पाटलांना विश्वास

सदाभाऊ खाेत म्हणाले शेतक-यांच्या दृष्टीने आजचा दिवस हा काळा म्हणावा लागेल. वर्षानुवर्ष लायन्स परमीटमधून मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करीत हाेता. बंदिस्त अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा ढकलण्याचा कटकारस्थान करण्याचे काम काही शेतकरी संघटनांच्या, काही उद्याेगपतींच्या माध्यमातून झालेले आहे. आता पुन्हा एकदा लायसन्स परमीट राजमध्ये शेतकरी जाणार. हा शेतक-यांच्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शेतक-यांच्या बाजारपेठेतील स्वातंत्र्य काही लाेकांनी हिरावून घेतले. दलाल, व्यापारी आणि भांडवलदार आणि सरकारचे लायन्स परमीट राज यांच्या ताब्यात धाेरण ठरविले गेले. वाट्टेल तेवढी आयात करा, निर्यात करा. ही सर्व बंधने लादण्याचे काम हे विधायक मागे घेण्याचे काम झालेले आहे. शेतक-यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले याची खंत वाटते.

स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले बहुमताच्या बळावर आम्ही काही करु शकताे हे या लाेकशाहीत चालत नाही हे या निर्णयाने सिद्ध झाले आहे. त्यांच्याकडे लाेकसभा, राज्यसभेत बहुमत हाेते. शेतकरी चिकाटीने लढत राहिले. आंदाेलनात फुट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. आज शेतक-यांचा विजय हा एेतिहासिक विजय झाला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com