शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला, दोन मुलांचा मृत्यू

आकाश राजेंद्र दुतकोर आणि चेतन सुरेश मसराम अशी दोन मृत मुलांची नावं आहेत.
शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला, दोन मुलांचा मृत्यू
शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला, दोन मुलांचा मृत्यूSaam Tv

यवतमाळ - शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दोन मुलांना शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला आहे. गाळात फसल्याने दोघांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी २० जुलै रोजी दुपारी यवतमाळमधील नांदुरा खुर्द येथे घडली.आकाश राजेंद्र दुतकोर आणि चेतन सुरेश मसराम अशी दोन मृत मुलांची नावं आहेत.

हे देखील पहा -

एका शेतात पिकाला खत टाकण्यासाठी ही मुले शेतात गेलेली होती. काम संपवून घरी परत जात असताना त्यांना पाण्याने भरलेल्या शेततळ्यात पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर दोघांनी शेततळ्यात सरळ उडी घेतली. शेततळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने ते दोघेही चिखलात रुतून बसले. शेततळ्यात उडी घेतलेली दोन्ही मुले पाण्याच्या बाहेर न आल्याने सोबत असलेल्या इतर मुलांनी या घटनेची माहिती नांदुरा खुर्द येथील ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेत शेततळ्यातून मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि या दोघांचाही मृत्यू झाला होता.

शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला, दोन मुलांचा मृत्यू
भंडारदरा निम्मे भरले तर कोथळे ओव्हर फ्लो

दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील यांनी बाभूळगाव पोलीस ठाण्याला देणे अपेक्षित होते. मात्र, ही घटना घडून अनेक तास झाल्यानंतरही या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com