Nagpur: नागपूरात 'स्वाईन फ्लू'चे आणखी २० बळी? मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत होणार स्पष्ट

Swine Flu Infection in Nagpur | मृत्यू विश्लेषण समितीनुसार, सध्या नागपूर शहरात ६, ग्रामीणमध्ये १ आणि जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
Swine flu infection in nagpur
Swine flu infection in nagpurब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: नागपूर (Nagpur) जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आल्यानंतर जिल्ह्यावर एक नवं संकट घोगावतयं. नागपूरात स्वाईन फ्लू (Swine Flu) या आजाराने डोकं वर काढलं आहे. स्वाईन फ्लू या आजाराने नागपूरात आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही रुग्णांचा मृत्यू हा स्वाईन फ्लूने झाल्याचा संशय आहे, याबाबत ३० ऑगस्टला मृत्यू विश्लेषण समितीची बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांत ज्या २० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत, ते स्वाईन फ्लूने झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० तारखेला होणाऱ्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. (Swine Flu In Nagpur)

हे देखील पाहा -

नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लू आजाराने आणखी २० बळी घेतले असल्याची शक्यता वर्तवली जातेय. याबाबत येत्या ३० तारखेला होणाऱ्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत रुग्णांच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात १० स्वाईन फ्लूग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झालं आहे. नागपूर जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ ते २५ ऑगस्टपर्यंत स्वाईन फ्लूचे ३४६ रुग्ण आढळले आहेत. नागपूर शहरात १९१ आणि शहराबाहेरील १५५ स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू विश्लेषण समितीनुसार, सध्या नागपूर शहरात ६, ग्रामीणमध्ये १ आणि जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.

Swine flu infection in nagpur
Fake Universities: देशातील २१ विद्यापीठे बनावट! दिल्ली पहिल्या क्रमांकावर; UGC ने जाहीर केली बनावट विद्यापीठांची यादी

स्वाईन फ्लूच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका:

स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तींना थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणं दिसतात. त्यामुळे यापैकी कोणतंही लक्षण तुम्हाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं हा आजार पसरण्याची शक्यता आहे. खोकला, शिंका, व्यक्तीच्या स्पर्शातून हा आजार पसरू शकतो. नाक, डोळे आणि कानावाटे याचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. डायबेटिस आणि हार्ट पेशंट असलेल्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनासोबत पुन्हा एकदा स्वाईन फ्लू डोकं वर काढत आहे. आधीच व्हायरल ताप आणि साथीच्या आजारांमुळे टेन्शन वाढत असताना नागपुरात स्वाईन फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com