राष्ट्रीय लोकअदालतीचा फायदा घ्या- नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधीकरण
जिल्हा विधीसेवा प्राधीकरण, नांदेड

राष्ट्रीय लोकअदालतीचा फायदा घ्या- नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधीकरण

नांदेड जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये तसेच कौटुंबिक, कामगार, व सहकार न्यायालयांमध्ये रविवार (ता. एक) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ता. एक आॅगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये तसेच कौटुंबिक, कामगार, व सहकार न्यायालयांमध्ये रविवार (ता. एक) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायायलयातील दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्टची प्रकणे, बॅंकची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटंबिक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अॅक्टची समाझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्या नागरिकांना त्यांची प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा.

हेही वाचा - SPECIAL BIG NEWS | मुंबईवरही दहशतीच्या घिरट्या, पाहा ही स्पेशल आणि महत्त्तवाची बातमी

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होउन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांतआणेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश राजेंद्र रोटे यांनी केले असून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com