Buldhana: अतिक्रमण अहवालासाठी लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

चार हजार रुपयांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

बुलडाणा - वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे किंवा नाही? याबाबतचा अहवाल तात्काळ पाठविण्यासाठी तलाठी प्रमोद हरिभाऊ दांदडे याने तक्रारदार यांच्याकडे पडताळणी कारवाई दरम्यान 4 हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारल्याने त्याला एसीबीच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले.

लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील एका तक्रारदार व त्यांची तर दोन साथीदार यांनी ग्राम सुलतानपूर येथील ई क्लास मधील भाडेपट्टीवर घेतलेल्या शेतीच्या वहिवाटीच्या रस्त्यावर सुलतानपूर येथील महिलेने अतिक्रमण केल्याबाबत तक्रार यांनी लोणार येथील तहसीलदार यांच्याकडे लेखी दिली होती.

हे देखील पाहा -

यासंदर्भात तहसीलदार यांनी तक्रारदार व त्यांचे साथीदार यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे किंवा नाही? याबाबत तलाठी, ग्रामसेवक व मंडळाधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सदरचा अहवाल आरोपी तलाठी प्रमोद हरिभाऊ दांदडे याने अहवाल लवकर पाठविण्यासाठी 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान सुलतानपूर येथील हॉटेल भोलेनाथ भोजनालय अँड वाईन बार येथे एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

Buldhana News
Vasai: वसईच्या समुद्रात आगसृदृश प्रकार; नागरिकांमध्ये घबराट

पंचासक्षम 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी दांदडे याला रंगेहात अटक करण्यात आली. एसीबीचे पोलीस उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोहेकॉ राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी, जगदीश पवार,अझरुद्दीन काझी, अर्षद शेख यांनी ही कारवाई केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com