तळवाडे ग्रामपंचायतीचा अजब फतवा; गावातील मजुरांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

किराणा व रेशन न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव
तळवाडे ग्रामपंचायतीचा अजब फतवा; गावातील मजुरांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
तळवाडे ग्रामपंचायतीचा अजब फतवा; गावातील मजुरांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराअभिजीत सोनावणे

नाशिक - जिल्ह्यातील मालेगावच्या तळवाडे ग्रामपंचायतीनं काढलेल्या अजब फतव्यातून मोठा गदारोळ निर्माण झालाय. कारण ठरवलेल्या मजुरी पेक्षा जास्त मजुरी घेतल्यास अथवा गावाबाहेर मजुरीला गेल्यास सामाजिक बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामपंचायतीनं दिला आहे. सध्या नाशिकच्या कसमादे परिसरात रब्बी हंगामाच्या कामांची लगबग सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमजुरांची टंचाई भासत आहे.

हे देखील पहा -

गावातील मजुरांनी गावातच कामे करावी यासाठी मजुरांसाठीचा दर ठरवला जातोय. प्रत्येक गावात मजुरीचे दर वेगळे जरी असले. तरी या मजुरांना जास्तीचा रोजगार मिळतो. त्या गावात मजुरीसाठी जाण्याचा कल अधिक असतो. बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांना गावतील कामे करता यावी यासाठी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळे ठराव केले जातात. मात्र मालेगावच्या तळवाडे ग्रामपंचायतीने केलेल्या या अजब ठरावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. गावाबाहेर कामाला जाणाऱ्या शेतमजुरांवर थेट बहिष्कार टाकण्याचा फतवाच ग्रामपंचायतीने अधिकृत पत्र काढून केला आहे.

तळवाडे ग्रामपंचायतीचा अजब फतवा; गावातील मजुरांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
शेतकऱ्यांसह माजी आमदार सुरेश लाड यांचा आत्मदहनाचा इशारा

विशेष म्हणजे नियम मोडणाऱ्या मजुरांना गावातील व्यावसायिकांनी किराणा देऊ नये, दळण दळून देऊ नये यासह रेशनही न देण्याचा ठराव केलाय. इतकेच नाही तर गावातुन मजूर घेऊन जाणाऱ्या आणि बाहेरून मजूर घेऊन येणाऱ्यावर 10 हजार रुपये दंड करण्याचा ठराव करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावाचे हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.

या निर्णयावर संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर हा निर्णय शेतकरी आणि शेतमजुरांच्या उपस्थितीत घेण्यात आला असून सर्वाना मान्य असल्याचा खुलासा ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. तर अंनिसकडून संबंधितांवर सामाजिक बहिष्कार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com