Raigad News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावत्या टँकरला आग, खोपोलीजवळील घटनेमुळे वाहतूक मंदावली

घटनेची माहिती मिळताच खोपोली नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
Raigad News
Raigad NewsSaam TV

>> सचिन कदम

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डांबराच्या टँकरला आग लागल्याची घटना घडली आहे. खोपोलीजवळ बोरघाटात अंडा पॉइंटजवळ धावत्या टँकरला ही आग लागली होती. काही क्षणात टँकरने पेट घेतला होता. घटनेची माहिती मिळताच खोपोली नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. (Raigad News)

बर्निंग टँकरचा थरार प्रवासी आणि वाहन चालकांनी आज एक्स्प्रेस वेवर अनुभवला. टँकर चालकाच्या ही दुर्घटना निदर्शनास येताच त्याने टँकर बाजुला घेतला. त्यानंतर तातडीने बचाव पथकांना पाचारण करण्यात आले.

देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल होते. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वांच्या मदतीने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. (Latest Marathi News)

Raigad News
Pune News : अरे चाललंय काय? पुण्यातील भूमकर पुलाजवळ २ तासांत दुसरा अपघात

महामार्गावरच टँकरने पेट घेतल्याने याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता. काही वेळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक देखील आता सुरळीत सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com