बेकायदा कोकेन बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास अटक

माकेटो जॉन झाकिया असे या तरुणाचे नाव असून इस्लामपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.,
बेकायदा कोकेन बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास अटक
बेकायदा कोकेन बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास अटकविजय पाटील

सांगली : पुणे-बेंगळूरू आशियाई मार्गावर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया Tanzania देशातील संशयित तरुण माकेटो जॉन झाकिया यास इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सुमारे १० लाख ९० हजार रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा :

आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास संशयित माकेटो झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस  मधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी वाघवाडी फाटा येथे सापळा लावला.

बेकायदा कोकेन बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास अटक
विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video
बेकायदा कोकेन बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास अटक
महिला पोलिसाने हात धुण्यासाठी खिडकीबाहेर काढला अन् साप चावला!
बेकायदा कोकेन बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास अटक
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!

बसची झडती घेतली असता झाकिया हा बसलेला आढळला. त्याच्या बॅग मध्ये १०९ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ मिळून आले. तो मुंबईहुन बेंगळूरू कडे निघाला होता. अंमली पदार्थ आणि एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत करीत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com