Nitin Gadkari News: टाटाचा प्रोजेक्ट नागपूरच्या मिहानमध्ये आणणार, नितीन गडकरी यांची ऑफ द रेकॉर्ड माहिती

नितीन गडकरी यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam TV

>> संजय डाफ

नागपूर : राज्यातील मोठे प्रकल्प बाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. टाटा एअरबस प्रकल्प यापैकीच एक होता. टाटा एअरबस प्रकल्प नागपूरमध्ये व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आग्रही होते. त्यासाठी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र तरीही प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे.

टाटाचा मोठा प्रोजेक्ट बाहेर गेल्याने रोजगाराला मोठा फटका बसला आहे. मात्र टाटाचा प्रोजेक्ट नागपूरच्या मिहानमध्ये आणणार असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी यांनी ऑफ द रेकॉर्ड ही माहिती दिली आहे. नागपूर विमानतळावर आल्यावर बाईट देण्यास त्यांनी नकार दिला, मात्र अनौपचारीक बोलताना त्यांही ही माहिती दिली. (Latest Marathi News)

Nitin Gadkari
PM Modi: महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती

गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना टाटाचा प्रकल्प मिहानमध्ये आणावा यासाठी पत्र लिहलं होतं. त्यानंतर टाटाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी गडकरी यांना पत्र लिहून सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे एकीकडे मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात असताना रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही नक्कीच दिलासादायक माहिती आहे.

Nitin Gadkari
Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभेचे बिगुल वाजले, निवडणूक आयोगाने जाहीर केल्या तारखा

महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर

महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे दोन लाख कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प मंजूर केले आहेत. या प्रकल्पांचे काम एकतर सुरू आहे किंवा लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी रुपये आणि आधुनिक रस्त्यांसाठी 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. जेव्हा सरकार पायाभूत सुविधांवर एवढी मोठी रक्कम खर्च करते, तेव्हा त्यातून लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com