Beed Suicide Case: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या...

Beed Crime News: काल त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कुटुंबियांना आढळला. घटनेची माहिती मिळताच, शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Teacher commits suicide after being harassed by a professor in beed
Teacher commits suicide after being harassed by a professor in beedविनोद जिरे

बीड: एका प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बीड शहरातील पालवन चौक परिसरात उघडकीस आली आहे. राहुल ईश्वर वाघमारे असं आत्महत्या (Suicide) केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. राहुल वाघमारे हे बीड (Beed) शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक (Teacher) होते. काल त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कुटुंबियांना आढळला. घटनेची माहिती मिळताच, शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हे देखील पहा -

Teacher commits suicide after being harassed by a professor in beed
Washim Breaking News: वाशिमच्या वाटाणे लॉन समोर भीषण अपघात; ३ ठार, ८ जखमी

यावेळी शिवाजीनगर पोलिसांना मृत शिक्षकाच्या घरात एक सुसाइड (Suicide Note) नोट देखील आढळली असून सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून, सदर शिक्षकाने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लाखेंसह एकावर 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे. दरम्यान मयत शिक्षकाने सहकारी प्राध्यापक बाळासाहेब लाखे आणि मुन्ना यांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले असून मागील दोन वर्षांपासून लाखे हे त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे सूसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे प्राध्यापक लाखे यांची चौकशी सुरू असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com