Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

Noise Pollution: डीजेच्या आवाजाने घेतला शिक्षकाचा बळी; मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर

अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नगरमध्ये शिक्षकाचा नाचता नाचता जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुशिल थोरात

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नगरमध्ये शिक्षकाचा नाचता नाचता जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

आज-काल लग्न समारंभात आणि विविध मिरवणूकांमध्ये डीजे वाजवणे हे एक फॅशन झाली आहे. या डीजेच्या आवाजामुळे अनेक लोकांना आता याचा त्रासही जाणवू लागला आहे. या डीजेच्या कर्कश आवाजामुळे काही वयोवृद्ध लोकांना ऐकण्यासाठी कमी येण्याचा ज्ञास सुरू झाली आहे.

तसेच अनेक तरुणांसह वयोवृद्ध लोकांना या डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा चटका येणे असे दुष्परिणाम या कर्कश डीजेच्या आवाजामुळे समाजात घडले आहेत. अहमदनगरमध्ये असाच प्रकार घडला आहे.

Ahmednagar News
Students stuck in Manipur Violence: मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पवारांचा पुढाकार, गृहमंत्र्यांना केला फोन

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका शिक्षकाचा मृत्यू असाच डीजेच्या आवाजामुळे झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. नेमका या डीजेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, याबाबत डॉक्टर सचिन चव्हाण यांनी विश्लेषण केले आहे.

कर्कश डीजेच्या आवाजामुळे आपल्या शरिरातील रक्ताभिसरण वेगाने होते. तसेच या डीजेच्या आवाजामुळे मेंदूवरही परिणाम होतो आणि या कर्कश आवाजामुळे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊन अखेर माणसाचा मृत्यू होत असल्याचं डॉक्टर सचिन चव्हाण यांनी सांगितल आहे.

नेमकं काय घडलं?

अहमदनगरमध्ये अशोक खंडागळे नावाच्या शिक्षकाचा नाचता नाचता अचानक जीव गेल्याची घटना घडली आहे. अशोक खंडागळे हे श्रीगोंदा येथील नारायण आश्रमाचे केंद्रप्रमुख होते. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते.हनुमान जयंतीच्या दिवशी कौडाणे गावात गेले होते. त्यावेळी डीजेचा मोठा आवाज सुरू होता. त्या डीजेचा त्यांना त्रास झाला. त्यामुळे अशोक यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

Ahmednagar News
Who is Pradeep Kurulkar: कोण आहेत प्रदीप कुरुलकर? पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनीट्रॅपमध्ये कसे अडकले?

अशोक रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोमात गेले होते. काही काळ श्रीगोंदा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याला हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. आवाजाचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला होता. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com