परीक्षांच्या तारखांचा घोळ काही संपेना; टीईटी परीक्षा पुन्हा ढकलली पुढे

टीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे.
TET Exam
TET ExamSaamTV

औरंगाबाद : राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी होणारी टीईटीची परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आजच सुधारित वेळापत्रक जाहीर केले. राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी टीईटी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. आता टीईटी ही परीक्षा 30 ऑक्टोबर 2021 ऐवजी 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणार असल्याचे सुधारित वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. (Teacher Eligibility Test exam postponed)

हे देखील पहा -

यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी UPSC प्रिलीमची परीक्षा असल्यानं राज्य परीक्षा परिषदेने TET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. 10 ऑक्टोबर 2021 ऐवजी 31 ऑक्टोबर 2021 रोजी टीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार होती. 10 ऑगस्ट रोजी 'टीईटी आणि यूपीएससी परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यी संभ्रमात' यावर बातमी दाखवली साम टीव्ही SaamTV न्यूजने दाखवली होती. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन अखेर परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा आरोग्य परीक्षेच्या Health examination घोळाचा फटका टीईटी परीक्षेला बसला. 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची परीक्षा असल्यानं पुन्हा टीईटीच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. 31 ऐवजी 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला होता.

TET Exam
... अखेर नाराज मोदींचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश (पहा व्हिडीओ)

राज्यात डीएड आणि बीएड पात्रताधारक भावी शिक्षकांसाठी घेण्यात येणारी TET exam पहिल्यांदा 10 ऑक्टोबर 2021 रोजी, त्यांनतर 30 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती. आता तिसऱ्यांदा परीक्षेच्या तारखेच्या बदल होऊन 21 नोव्हेंबर 2021 रोजी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. एक तर राज्यात शिक्षकांची भरती केले जात नाही आणि दुसरीकडे शिक्षकांच्या पात्रता परीक्षेसाठीही सरकार आणि परीक्षा परिषद गंभीर नाही, असा आरोप आता परीक्षार्थी करीत आहेत.

परीक्षेचे सुधारित वेळापत्रक-

प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 26 ऑक्टोबर 2021 ते 21 नोव्हेंबर 2021

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 : 21 नोव्हेंबर 2021, वेळ सकाळी साडेदहा ते एक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 : 21 नोव्हेंबर 2021, वेळ दुपारी 2 ते 4:30

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com