K Chandrashekar Rao News
K Chandrashekar Rao NewsANI/twitter

K Chandrashekar Rao News: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, मी भारताचा...

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संजय सूर्यवंशी

Nanded News : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. के.चंद्रशेखर राव यांनी नांदेडच्या लोहा येथे 'तुमचं महाराष्ट्रात काम नाही, फडणवीस यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी भारताचा नागरिक आहे. मी भारताच्या नागरिकांसाठी काम करणार आहे, असं म्हणत के. चंद्रशेखर राव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची नांदेडच्या लोहा येथील सभा झाली. या सभेत के.चंद्रशेखर राव यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. या सभेत के. चंद्रशेखर राव यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

K Chandrashekar Rao News
Ajit Pawar यांनी दिला विद्यार्थांना सल्ला! मित्र मैत्रिणी निवडताना काळजी घ्या !

के.चंद्रशेखर राव म्हणाले, ' देवेंद्र फडणवीस म्हटले की, 'तुमचं काम तेलंगणामध्ये आहे, महाराष्ट्रात नाही. तुम्ही तुमचं तिकडं पहा'. पण त्यांना सांगू इच्छितो की, 'मी भारताचा नागरिक आहे. मी भारताच्या नागरिकांसाठी काम करणार आहे. मी महाराष्ट्रत येणार नाही, परंतु महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना वीज मोफत, पाणी मोफत, शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये, तेलंगणा राज्यात ज्या योजना आहेत, त्या महाराष्ट्रातील जनतेला देण्यात यावे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे'.

'मी महाराष्ट्रत पाय ठेवणार नाही, या सर्व योजना महाराष्ट्रातील जनतेला मिळाल्यास मला महाराष्ट्रात येण्याची गरज नाही, असे के. चंद्रशेखर राव म्हणाले.

'नांदेडमध्ये आमची पहिली सभा झाली. आमचा धसका घेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना 6 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. पण आम्हाला 6 हजार रुपये नको, आम्हाला एकरला 10 हजार रुपये अनुदान पाहिजे, अशी मागणी देखील के चंद्रशेखर राव यांनी केली आहे.

'कोणासमोर भीक मागण्याची गरज नाही म्हणून मी एक नारा दिला आहे. तो म्हणजे अब की बार किसान सरकार, असेही राव म्हटले.

'शेतकऱ्यांना मोफत वीज,मोफत पाणी पाहिजे असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत बीआरएस पक्षाची ताकद दाखवा. मग पहा सगळे तुमच्या कडे पळत येतील, असा संदेश देखील कार्यकर्त्यांना दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com