नंदुरबारच्या चरणमाळ घाटात टेम्पोला अपघात; कोंबड्या आणि वाहनाचा चेंदामेंदा!

अपघातात वाहनासह कोंबड्या चक्काचूर; दोन जण जखमी!
नंदुरबारच्या चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेला टेम्पो पलटी!
नंदुरबारच्या चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेला टेम्पो पलटी! SaamTvNews

नंदुरबार : नवापुर-पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेल्या आयशर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने तीव्र उतारावरील वळनावर चालकाचा (Driver) वाहनावरील ताबा सुटल्याने कठडा तोडून पलटी झाला आहे. या अपघातात चालक व अन्य एक जण किरकोळ जखमी झाले असून टेम्पोचा मात्र चक्काचूर झाला आहे.

हे देखील पहा :

या अपघातात (Accident) कोंबड्या (Hens) आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. कोंबड्यांनी भरलेला टेम्पो नाशिकहून अहमदाबादकडे जात होता. टेम्पो (Tempo) घाटातील तीव्र वळण रस्त्यावर आला असता चालकाने वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबला. मात्र, ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे सदर वाहनावरील नियंत्रण सुटून टेम्पो रस्त्यावर असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला.

नंदुरबारच्या चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेला टेम्पो पलटी!
अवैध वाळू तस्करीत सामील असणाऱ्या वाहनांची कायमची जप्ती होणार

या अपघातात चालक हैदर अली मोहम्मद अली नीलगर (वय ३९) राहणार अहमदाबाद (गुजरात) हा किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवापूर (Navapur) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात टेम्पो चक्काचूर झाला असून कोंबड्या आणि वाहनाचा (Vehicles) चेंदामेंदा झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com