साताऱ्याच्या प्रियंकाला टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड जाहीर...

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याची शिखरकन्या प्रियंका मोहितेच्या घरी भेट देऊन तिचा सत्कार केला आहे.
साताऱ्याच्या प्रियंकाला टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड जाहीर...
साताऱ्याच्या प्रियंकाला टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड जाहीर...ओंकार कदम

सातारा: साताऱ्याची शिखर कन्या अशी ख्याती मिळवलेल्या प्रियंका मोहिते हिला केंद्र सरकारचा टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड जाहीर झाला आहे. अतिउच्च अन्नपूर्णा शिखर सर केल्यानंतर तिला हा पुरस्कार जाहीर झाला असून दि. 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात तिचा सन्मान केला जाणार आहे. या यशाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. (Tenzing Norgay National Adventure Award for Priyanka from Satara)

हे देखील पहा -

केवळ छंद म्हणून नव्हे तर पॅशन म्हणून अनेक शिखरे आणि पर्वत सर करणाऱ्या प्रियंकाला अर्जुन अवॉर्ड सारखा पुरस्कार मिळाला असून त्यामुळे साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार मिळाला म्हणून ती थांबणारी नाहीये तर तिची नवीन यादी तयार असेल आणि आगामी काळात ती यादीत नमूद सर्व शिखरे पदांक्रांत करेल अशा शुभेच्छा सातारकरांच्या वतीने देतो, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रियांकाचे कौतुक केले. 

साताऱ्याच्या प्रियंकाला टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड जाहीर...
नादच खुळा: डोंबिवलीत बनवला भव्य लोहगड किल्ला...

पुरस्कार मिळण्याने खूपच आनंद झाला असून आणखी मोठी कामगिरी करण्याची प्रेरणा आणि बळ मिळाले आहे. यापुढेही आपल्या साताऱ्याचे नाव आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करीन, असा विश्वास प्रियांका मोहिते हिने व्यक्त केला.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com