Sangli: भजनाला जात असताना टेम्पो-कारचा भीषण अपघात; अपघातात २ जण जागीच ठार

तुंग येथील काही भजनी मंडळाच्या महिला एका टेम्पोमधून शिरोळकडे निघाल्या होत्या तर सांगली शहरातून कसबेडिग्रजकडे चार चाकी वॅगणार कार निघाली होती.
Sangli: भजनाला जात असताना टेम्पो-कारचा भीषण अपघात; अपघातात २ जण जागीच ठार
Accident NewsSaam tv

सांगली : सांगलीतील (Sangli) नेहमी रहदारी असणाऱ्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर काल रात्री एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत इतर गंभीर जखमी आहेत. तुंग येथील काही भजनी मंडळाच्या महिला एका टेम्पोमधून शिरोळकडे निघाल्या होत्या तर सांगली शहरातून कसबेडिग्रजकडे चार चाकी वॅगणार कार निघाली होती. भरधाव असणाऱ्या दोन्ही गाड्या कृष्णा नदीवरील असणाऱ्या आयर्विन पुलावर येताच समोरासमोर धडक होऊन हा अपघात (Accident) घडला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत.

Accident News
घरच्यांचा दावा बाल संरक्षण समितीने खोडला; जन्मतारखेचा दाखला देत बालविवाह रोखला

तसंच टेम्पोमधील १० जण आणि वॅगणार मधील एक असे ११ जण जखमी झाले असून अपघातानंतर जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सांगली शहर पोलीस (Sangli City Police) आणि महानगरपालिका अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले. टेम्पोमधील सर्व १२ जण शिरोळला भजनाच्या कार्यक्रमास निघाले असताना त्यांच्यातील दोन साथीदारांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com