ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चुराडा ४ मृत्यू
ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चुराडा ४ मृत्यूजयेश गावंडे

ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चुराडा ४ मृत्यू

कार व ट्रकच्या भीषण अपघातात अकोल्यामधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जयेश गावंडे

अकोला : कार Car व ट्रकच्या truck भीषण अपघातात अकोल्यामधील Akola तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाचे उपचारादरम्यान प्राण गमावले आहे. अकोला शहरापासून जवळच येत असलेल्या, राष्ट्रीय महामार्ग National Highways क्रमांक ६ रिधोरा या ठिकाणी रिलायन्सच्या पेट्रोल Reliance's petrol पंपानजीक मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. Terrible truck accident

या दोन वाहनांची धडक इतकी जोरात होती, की कारचा अक्षरशः जागीच चुराडा झाले आहे. रात्रीच्या सुमारास प्रवास करणे धोकादायकच असते. महामार्गावर रस्ते व वाहतूक जीवघेणी ठरत असल्याचे उदाहरणं अनेकदा बघायला मिळतात. काल मध्यरात्रीच्या वेळेस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पण अशीच घटना घडली आहे.

हे देखील पहा-

शेगावकडून MH-३७ G ८२६२ ही कार वाशिमकडे जात असताना, यावेळी विरुद्ध दिशेने जोरात येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली आहे. या अपघातामध्ये कारमधील ३ जागीच मृत्यू झाला तर १ गंभीर जखमी झालेला उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. Terrible truck accident

ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चुराडा ४ मृत्यू
स्वीडनमध्ये भीषण विमान अपघात; ९ जणांचा मृत्यू

अपघात एवढा भयानक होता की त्यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे, तर ३ जणांना घटनास्थळीच स्वतःचे प्राण गमवावे लागले आहे. त्यामधील १ गंभीर अवस्थेतमध्ये पुढील उपचारासाठी अकोला सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यात जखमी व्यक्तीचा सकाळी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक वाशिम जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यामध्ये येत असल्याचे पांगरीकुटे या ठिकाणचा रहिवासी होता. पुढील तपास बाळापूर पोलीस करित आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com