नाशकात कोयता गँगची दहशत (पहा व्हिडिओ)
पिंपरी-चिंचवड मध्ये 'कोयता भाई' ! SaamTv

नाशकात कोयता गँगची दहशत (पहा व्हिडिओ)

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक - नाशकात Nashik कोयता गॅंगची Koyta Gang दहशत निर्माण झाली आहे.कोयता गॅंगची मुक्तिधाम शेजारी असणाऱ्या बाजारात मोठी दहशत आहे. दिवसाढवळ्या ही कोयता गॅंग वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरते आणि कोयता व तलवारीचा धाक दाखवून पैसे वसूल करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर दुकानदारांनी या कोयता गॅंगच्या सदस्यांना प्रतिकार केल्यास त्यांना मारहाण देखील करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामुळे व्यावसायिक भयभीत झाले आहेत. उपनगर पोलीस Police ठाण्यात सर्व व्यापाऱ्यांच्यावतीने तक्रार देण्यात आली आहे.

कापड व्यावसायिक लक्ष्मी पांडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या दुकानात कोयता गॅंगचे सदस्य धाक दाखवून रोकड आणि कपडे घेऊन गेले. त्यांच्या हातात कोयते असल्यामुळे आम्ही प्रतिकार केला नाही अशी माहिती कापड व्यावसायिक लक्ष्मी पांडे यांनी दिली. मात्र महिना- दोन महिने ही कोयता गँग दुचाकी वर येते आणि कोयत्याचा धाक दाखवून रोकड आणि कपडे घेऊन पसार होत होते.

पिंपरी-चिंचवड मध्ये 'कोयता भाई' !
1 नोव्हेंबरपासून 'या' स्मार्टफोनमध्ये बंद होणार व्हॉट्सअॅप सेवा; वाचा यादी

अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या, मात्र पोलीस दखल घेत नसल्याची माहिती समोर आली आहे. या कोयता गॅंगचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सामान्य व्यापाऱ्यांनाही कोयता गॅंग नशा करून धमकावत असल्याची बाब समोर आली आहे. उपनगर पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या आणि लुटणाऱ्या कोयता गॅंगचा बिमोड करावा, अशी मागणी आता व्यापारी संघटनेकडून करण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांना भेटून व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन देखील दिले जाणार आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com