TETचा पेपर सोडविला Bluetooth लावून ; परिक्षार्थीमुळे प्रकार उघडकीस

संत तुकाराम शाळेमध्ये TET चा पेपर चालू असताना रूम नंबर 5 मध्ये एका मुलीने ब्लूटूथ लावून पेपर सोडवण्याची तक्रार सोबतच्या विद्यार्थिनीने केली
TETचा पेपर सोडविला Bluetooth लावून ; परिक्षार्थीमुळे प्रकार उघडकीस
TETचा पेपर सोडविला Bluetooth लावून ; परिक्षार्थीमुळे प्रकार उघडकीसSaam TV

गोंदिया : आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शिक्षक पात्र परीक्षा (TET) सुरू असून जिल्हात अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. गोंदियातील (Gondia) संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील परीक्षा केंद्रावर खोली क्रमांक 5 मध्ये एका भावी शिक्षीकेने चक्क ब्लूटूथच्या माध्यमातून पेपर सोडविताना सोबतच्या परीक्षार्थीने पकडले आणि या प्रकरणाचा भांडाफोड करून पर्दाफाश केला आहे.

संत तुकाराम शाळेमध्ये TET चा पेपर चालू असताना रूम नंबर 5 मध्ये एका मुलीने ब्लूटूथ लावून पेपर सोडवण्याची तक्रार सोबतच्या विद्यार्थिनीने केली, त्यामुळे बराच गोंधळ उडाला. पोलिसांना बोलावण्यात आले. कोणत्याही परीक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्याची परवानगी नसते. मग या मुली जवळ ब्लूटूथ आला कसा, सेंटर वर चेकिंग झाली नाही का? चेकिंग झाली तर ब्लूटूथ का दिसला नाही, हे सर्व प्रश्न टीईटी परीक्षा देणारे म्हणजे भावी शिक्षक विचारत आहेत. उद्याचे शिक्षकच जर असे प्रकार करु लागले तर देशाचे भविष्य कोण घडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलीच्या तक्रारीवरून सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत तर संबंधीत मुलीवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com